सावंतवाडी पं. स. ; सभापतीपदाच्या सुस्मिता जाधव दावेदार

Edited by: विनायक गांवस
Published on: February 10, 2026 14:04 PM
views 101  views

सावंतवाडी : तळवडे पंचायत समितीसाठी सावंतवाडी मतदारसंघातून प्रतिष्ठेच्या ठरलेल्या सभापतीपदाच्या उमेदवारामध्ये तळवडे पंचायत समिती मतदारासंघातून एकूण ४ उमेदवार उभे राहीले होते. महायुतीचे उमेदवार म्हणुन शिवसेनेच्या सुस्मिता जाधव या निवडून आल्या. 

त्यांना राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने निवड झाल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले निवडणुक निर्णय अधिकारी समीर घारे यांच्याकडून हे प्रमाणपत्र देण्यात आले. सुस्मिता जाधव या सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती पदाच्या दावेदार असून आरक्षणामुळे त्या या पदावर विराजमान होणार आहेत.

यावेळी माजी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी सभापती अशोक दळवी, खरेदी-विक्री संघाचे व्हाईस चेअरमन राजन रेडकर, तालुका धनगर समाजाचे प्रमुख आनंद वरक, मळगांव विभाग प्रमुख संदेश सोनुर्लेकर, कलंबिस्त विभाग प्रमुख संजय पालकर, संघटक संजय गावडे, वेर्ले पदाधिकारी चंद्रकांत राणे तथा शिवसेना शहर सचिव विश्वास घाग व इतर उपस्थित होते.