अक्कलकोट वटवृक्ष मंदिराचे अध्यक्ष महेश इंगळे यांची कुडाळात सदिच्छा भेट

'स्वामी सदन' दुमदुमले नामघोषाने !
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: February 10, 2026 16:33 PM
views 33  views

कुडाळ : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ (वटवृक्ष) देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना कुडाळ येथील माजी नगरसेवक राकेश कांदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी कांदे कुटुंबीय आणि असंख्य स्वामी भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा भक्तीमय वातावरणात आणि स्वामींच्या जयघोषात पार पडला.

 महेश इंगळे यांनी कुडाळ-नाबरवाडी येथील राकेश कांदे यांच्या "स्वामी सदन" या निवासस्थानी भेट दिली. यावेळी कांदे कुटुंबीयांच्या वतीने त्यांचे औक्षण करून पारंपरिक पद्धतीने पाद्यपूजा करण्यात आली. तसेच श्री स्वामी समर्थांची प्रतिमा, शाल आणि पुष्पहार अर्पण करून इंगळे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना महेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव कथन केले. त्यांनी उपस्थित भक्तांना अनमोल मार्गदर्शन करत आशीर्वाद दिले. त्यांच्या या मार्गदर्शनाने उपस्थित भाविक भारावून गेले होते.

या सोहळ्यासाठी अक्कलकोट देवस्थानचे सचिव  आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी,  प्रथमेश इंगळे, शैल गवंडी, ज्ञानेश्वर भोसले तसेच देवगड हडपीठ मठाचे नंदकुमार पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी स्वामी भक्त सदानंद कांदे, सागर कांदे, अनिश सावंत, राजेश मांजरेकर, नितीन सोलकर, सचिन कुडतरकर, बापू सावंत, मयूर कुडतरकर, जितू राणे, विलास रुद्रे, स्वरूप सावंत, सागर मठकर, प्रथमेश वर्दम, पप्पू शिरसाठ, कौस्तुभ कुडतरकर, बनी तळवलकर, शशांक पिंगुळकर, अविनाश पाटील, अभय म्हापसेकर,  वनिता जाधव,  कुणकवळेकर यांच्यासह १०० हून अधिक स्वामीभक्त उपस्थित होते. संपूर्ण वातावरण 'श्री स्वामी समर्थ' यांच्या नामघोषाने दुमदुमून गेले होते.