
वेंगुर्ले : आसोली-राजधुरीवाडी येथील श्रीमती सुशीला मधुकर धुरी यांचे नुकतेच वयाच्या ८२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या गेली अनेक वर्षे मुंबई येथे वास्तव्यास होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचार सुरू असतानाच २१ डिसेंबरला त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे, दीर, पुतणे, सुना असा मोठा परिवार आहे. आसोली हायस्कूलचे संस्थापक भिकाजी उर्फ दादा धुरी यांच्या त्या भावजई, भास्कर धुरी यांच्या काकी तर पत्रकार शुभम धुरी यांच्या त्या आजी होतं.