
देवगड : देवगड तालुक्यातील शिरगाव येथील ७६ वर्षांची परंपरा असलेल्या एकमेव सार्वजनिक गणपती शिरगांवच्या राजाचे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दर्शन घेतले. यावेळी सुशांत नाईक यांचे शिरगांव बाजारपेठ येथे स्वागत करण्यात आले.
युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी देवगड तालुक्यातील ७६ वर्षांची परंपरा असलेल्या एकमेव सार्वजनिक गणपती शिरगांवच्या राजाचे आज दर्शन घेतले. यावेळी उबाठा कणकवली विधानसभा जिल्हा प्रमुख संदेश पारकर, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, उपतालुका प्रमुख रविंद्र जोगल, विभाग प्रमुख मंगेश फाटक, शाखा प्रमुख महेश मेस्त्री, कार्यकर्ते व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.