सुर्यकांत आडेलकर - महेंद्र डुबळे यांचं रक्तदान

रूग्णांना जीवदान
Edited by: विनायक गांवस
Published on: November 03, 2024 12:56 PM
views 215  views

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे सुरक्षारक्षक सुर्यकांत आडेलकर यांनी ओरोस येथे व महेंद्र डुबळे यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय जात रक्तदान करत रूग्णांना जीवनदान दिले. भाग्यश्री राऊत आणि श्रीदेवी तेरसे या महिला रुग्णांना जीवदान दिले. अत्यंत तातडीने दुर्मिळ O निगेटिव्ह या रक्ताची आवश्यकता असताना युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांच्या माध्यमातून धाव घेत पवित्रदान केलं.यासाठी ओ निगेटिव्ह या रक्तगटाची आवश्यकता असल्याने रक्तदात्यांअभावी रूग्णांची गैरसोय होत होती. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर यांनी देव्या सुर्याजी यांच्याशी संपर्क साधत तातडीने रक्तदाते उपलब्ध करण्यास सांगितले.त्वरीत रक्तदाते उपलब्ध झाल्याने रूग्णांच्या नातेवाईक व डॉक्टर यांनी युवा रक्तदाता संघटनेचे व रक्तदात्यांचे आभार मानले.