
कणकवली : युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या संकल्पनेतून कणकवली विधानसभा मतदार संघात शिरगांव, फणसगांव, कलमठ, वैभववाडी, कनेडी व पडेल येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाली. या शिबिरातून सुमारे 250 रुग्णांना मोतीबिंदू आढळून आले होते.
युवासेनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील शिरगांव, कलमठ व कनेडी येथील 60 रुग्णांवरील शस्त्रक्रिया आज ओरोस येथे पार पडल्या. अशाच टप्प्याने पुढील 250 रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. युवासेनेने राबविलेल्या या शस्त्रक्रियेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी ग्रामस्थांनी शिवसेना उ.बा.ठा व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे आभार मानले. असेच पुढील टप्प्यात उर्वरित शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत याची माहिती नाईक यांनी दिली.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, छोटू पारकर, कुणाल सावंत आधी शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.