आंबेडकर चळवळीतील निष्ठावंत सुरेश कदम यांचं निधन

Edited by: विनायक गांवस
Published on: August 16, 2025 18:36 PM
views 30  views

सावंतवाडी : सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संस्थेचे संस्थापक तथा आंबेडकर चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते व सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी सुरेश सखाराम कदम 68 यांचे आज अल्पशा आजाराने कणकवली येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. 

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून नातवंडे, दोन भाऊ तीन बहिणी असा मोठा परिवार आहे कै. कदम यांनी प्रतीकुल परिस्थितीतून शिक्षण घेतल्यानंतर आपल्या नोकरीची सुरुवात तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यात  महसूल खात्यात लिपिक पदावरून केली होती मात्र महसूल खात्याच्या परीक्षा देत त्यांनी उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल गाठली. त्यांनी कणकवली वेंगुर्ला मालवण राजापूर येथे नोकरी करीत सेवानिवृत्त काळ विदर्भात भंडारा येथे2013 मध्ये पूर्ण केला. अत्यंत अभ्यासू गोरगरिबाबद्दल कणव व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता सेवा निवृत्तीनंतर जिल्ह्यात स्थापन झालेल्या सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संस्थेच्या स्थापनेतही त्यांचा सिंहाचा वाटा होता. 

सध्या ते कणकवली येथे स्थायिक झाले होते उद्या त्यांच्या मूळ गावी शिरवली तालुका देवगड येथे सकाळी माजी आमदार प्रमोद जठार,तथागत पतसंस्थेचे. अध्यक्ष तथा सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अरविंद वळंजू, सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत कदम, ठाणे येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ तथा बंधू डॉ .संदीप कदम, वंचितचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, शिवाय फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्, विविध बौद्ध संघटनांचे पदाधिकारी व मान्यवर यावेळी उपस्थित होते.