
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची जिल्हास्तरीय बैठक ओरोस येथे राजेंद्र माणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. यावेळी सर्वानुमते शिक्षक परिषदेच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदी सुरेखा वि. शिंदे (वेंगुर्ला हायस्कूल), श्वेता प्र. मोरजकर (पोईप हायस्कूल) यांची निवड करण्यात आली.
यावेळी शिक्षक परिषदेचे ज्येष्ठ नेते वेणुनाथ कडू, जिल्हा सचिव सलिम तकिलदार, वाय.पी.नाईक, एस. एम. सांगळे, मुख्याध्यापक नंदन घोगळे, एन. पी. मानकर, भरत केसरकर, चंद्रकांत कानकेकर, एस. पी. कुळकर्णी, विश्वास वाघमोडे आदी उपस्थित होते.
यावेळी आगामी शिक्षक आमदार निवडणूकीसाठी जिल्ह्यातील तमाम शिक्षक बांधवांना भेटून परिषदचेच आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी हक्काचे आमदार म्हणून वेणुनाथ कडू यांनाच विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला.
शेवटी आभार ज्येष्ठ शिक्षक वाय.पी.नाईक यांनी मानले.