सुप्रिया सुळे यांचं बांद्यात जंगी स्वागत !

Edited by: विनायक गावस
Published on: October 27, 2023 10:54 AM
views 193  views

सावंतवाडी :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच जंगी स्वागत बांदा येथे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून करण्यात आलं. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्या म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट नाही. विचारात भिन्नता असलेला गट बाजूला गेला असं मत त्यांनी व्यक्त केल‌ं.

तर निलेश राणे यांच्या राजकीय संन्यासाबाबत विचारल असता,  निलेश राणे यांनी राजकारणातून संन्यास घेतला हे माझ्या वाचनात आलं नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, उपाध्यक्ष आसिफ शेख, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, हिदायतुल्ला खान, बावतीस फर्नांडिस, इफ्तेकार राजगुरू, अँड.सायली दुभाषी आदीसह पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.