वैभववाडी महाविद्यालयाची सुप्रिया काडगे सेट परीक्षा उत्तीर्ण...!

Edited by: संदीप साळुंखे
Published on: July 01, 2023 19:07 PM
views 265  views

वैभववाडी : आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी सुप्रिया काडगे हीने आपल्या अभ्यासूवृत्तीने व जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर नुकत्याच सावित्रीबाई फुले विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या कॉमर्स आणि अकाउंटन्सी विषयांतील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेमध्ये  उज्ज्वल यश संपादन केले आहे.

सुप्रियाने यापूर्वी एम.कॉम या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास 81.44 टक्के गुण घेऊन महाविद्यालयामध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळवला होता.  तिच्या या यशासाठी कॉमर्स विभागातील सर्व शिक्षकांचे महत्त्वाचे मार्गदर्शन लाभले आहे.  या तिच्या उज्वल यशासाठी महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमार्फत सर्वत्र अभिनंदन होत आहे.