मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा

इन्सुली ते सावंतवाडी मोटरसायकल रॅली
Edited by: विनायक गावस
Published on: November 02, 2023 15:56 PM
views 603  views

सावंतवाडी : इन्सुली सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मुख्यमंत्री यांना तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. इन्सुली ते सावंतवाडी मोती तलावाच्या सभोवताली सुमारे १०० ते १३० जणांनी मोटरसायकल रॅली काढून निवेदन दिले. त्यानंतर चराठा पागावाडी आरटीओ नाका ते कोंडवाडा पर्यंत बाईक रॅली काढली. एक मराठा लाख मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे आणि जरांगे पाटील यांचा विजय असो च्या घोषणा दिल्या.

सकल मराठा समाज इन्सुलीच्या वतीने निवेदन तहसीलदार श्रीधर पाटील यांना देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे,शासनाकडुन सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असुन मराठा समाजाला आरक्षणापासुन वंचित ठेवण्यात आले आहे. आमच्या समाजाचे नेते श्री. मनोज जरंगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आमरण उपोषण करत आहेत. मराठा समाजामध्ये आर्थिक मागासलेपणा असलेल्यांची संख्या बरिच जास्त असुन हुशार व होतकरू विद्यार्थी शैक्षणीक सवलती पासुन वंचित राहत असुन अशा विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळणे अत्यंत महत्वाचे आहे.

मराठा आंदोलनास पाठींबा म्हणुन आम्ही सकल मराठा समाज इन्सुलीच्या वतीने लाँग मार्चचे आयोजन केले आहे. आपण आमच्या सकल मराठा समाजाच्या मराठा आरक्षण व समाजातील मुलांचे होणारे शैक्षणीक नुकसान टाळण्यासाठीच्या भावना मा. मुख्यमुत्री महाराष्ट राज्य व शासन दरबारी पोहोचवाव्यात असे या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर, अध्यक्ष नितीन राऊळ, सचिव विनोद गावकर, आपा आंमडोसकर, अमित सावंत, अजय सावंत, संजय पालव, सचिन दळवी, सचिन पालव, गजेंद्र कोठावळे, अशोक सावंत,  महेंद्र सावंत, वर्षा सावंत, राजन परब, संतोष परब, महेंद्र पालव, अजय कोठावळे, किरण गावडे, संदीप कोठावळे, सुंदर आरोसकर, रवी परब, दिगंबर परब, साई राणे, हेमंत नाईक,  सदा राणे,रामचंद्र कोठावळे, गजानन गावकर, सुहास ठाकूर, आनंद राणे, भाई देसाई, मनोहर गावकर, सत्यवान गावडे, उल्हास सावंत , रुपेश परब, अँड कौस्तुभ गावडे, काका चराटकर, नाना पाटकर,  भिवा मुळीक, सुजय कोठावळे, यश गावकर, विनय गावकर, उल्लास सावंत, नलु मोरजकर, प्रदीप कोठावळे, उमेश मोरजकर, तुषार कानसे, आपा केसरकर, अभय कोठवळे, सुरेंद्र कोठावळे, सुधीर गावडे,महेश धुरी, नंदू पालव, पिंटो हांडेकर,  वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, बांदा मराठा समाज अध्यक्ष बाळू सावंत, व समाजबांधव उपस्थित होते.

यावेळी मराठा समाज तालुका अध्यक्ष सिताराम गावडे आणि इन्सुली मराठा समाज सचिव विनोद गावकर यांनी विचार मांडले. मराठा समाजातील तरुण वर्ग गुणवत्ता असूनही मागे पडत आहे. तसेच आर्थिक दृष्ट्या कमकुवत बनत आहे. त्यामुळे आरक्षण मिळावे म्हणून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आसनस्थ पुतळा आणि मोटरसायकल रॅली ने इन्सुली ते सावंतवाडी शहर दुमदुमून गेले. या रॅलीचा श्रीफळ वाढवून विनोद गावकर यांनी शुभारंभ केला. सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतानाच सावंतवाडी व बांदा पोलिसांच्या सहकार्याबद्दल आभार विनोद गावकर यांनी मानले.