चिंदरात गुरे दगावली ; ठाकरे गटाकडून शेतकऱ्यांना आधार

२ लाखांची आर्थिक मदत
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 14, 2023 20:10 PM
views 112  views

मालवण : मालवण तालुक्यातील चिंदर गावातील गुरांना चाऱ्यातून विषबाधा झाल्याने सुमारे ४५  गुरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण ३५ शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. या सर्व शेतकऱ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या  माध्यमातून खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी रोख स्वरूपात २ लाख रु. च्या आर्थिक मदतीचे आज वाटप केले. शेतकऱ्यांवर ओढवलेल्या या संकटात शिवसेना पक्षाने धावून जात शेतकऱ्यांना आधार दिला. तसेच कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याचे वचन दिले.

चार दिवसापूर्वी पासून चिंदर गावात गुरे दगावण्याच्या घटना घडल्या होत्या. आमदार वैभव नाईक यांनी  दोन वेळा चिंदर गावाचा दौरा करून गुरांना झालेल्या रोगावर उपाययोजना करण्याची सूचना पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना केली होती. तसेच मुंबई विभागाचे प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. प्रशांत कांबळे यांच्या पथकासमवेत बैठक घेऊन आढावा घेतला होता. तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे आश्वासन आ.वैभव नाईक यांनी दिले होते. आज या शेतकऱ्यांना शिवसेनेच्या वतीने आर्थिक मदत करून त्यांना धीर देण्यात आला. याबद्दल शेतकऱ्यांनी आभार मानले.

           यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद कांबळे, डॉ. संजय शिरसाट, डॉ. प्रदीप राणे,आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, विभाग संघटक चंद्रकांत गोलतकर, उपविभाग प्रमुख अनिल गावकर, भाऊ परब, पप्पू परुळेकर, शाखा प्रमुख मिलिंद चिंदरकर,शाखा प्रमुख सतीश हडकर, चिंदर ग्रा. प. सदस्य केदार परुळेकर, डॉ. प्रभाकर सावंत, पळसंब उपसरपंच अविराज परब, श्रीकांत बागवे, निशांत पारकर, संजय हडपी, प्रसाद टोपले, संजय सामंत, धनंजय नाटेकर, सुधाकर कोंडस्कर,विल्यम फर्नांडिस,संतोष पाटणकर, अमित कानविंदे, निलेश रेवडेकर, शाम घाडी, विजय रेवडेकर,फासकू फर्नांडिस,करण खडपे, भरत राणे, योगेश चव्हाण, अक्षय भोसले, देवेंद्र बागवे, महेंद्र गोसावी आदी उपस्थित होते.