सावंतवाडी टर्मिनसच्या मागणीसाठी होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हा

सागर नाणोसकर यांचं आवाहन
Edited by: भगवान शेलटे
Published on: January 25, 2024 06:47 AM
views 139  views

सावंतवाडी : कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या माध्यमातून २६ जानेवारीला सकाळी १० वाजता सावंतवाडी टर्मिनस आणि अन्य प्रलंबित मागण्यासाठी होणाऱ्या रेल्वे स्थानक येथील लाक्षणिक उपोषणाला सर्व नागरिकांनी, विविध संस्था, संघटना, व्यापारी संघटना, रीक्षाचालक संघटना, वकिल - डॉक्टर संघटना तसेच कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवासी बांधव भगिनी आणि युवकांनी सहभागी होऊन पाठिंबा द्यावा  असं आवाहन सागर नाणोसकर यांनी केलं आहे.