रेशन दुकानदार संघटनेचा नितेश राणेंना पाठिंबा

Edited by:
Published on: November 15, 2024 11:47 AM
views 250  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा रेशन दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांना भेट देऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अडचणीच्या वेळी व समस्येच्या निराकरणासाठी आमदार नितेश राणे यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत संघटनेने हा पाठिंबा व्यक्त केला.

संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रुपेश पेडणेकर यांनी आमदार राणे यांना विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांच्यासोबत कणकवली तालुकाध्यक्ष बाबू नारकर, देवगड तालुका अध्यक्ष विकास गोखले, जिल्हा सचिव शैलेंद्र कुलकर्णी उपस्थित होते. संघटनेच्या मते, रेशन दुकान व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार राणे यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच संघटनेने एकत्रितपणे त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी निलेश सोरप, गणेश गावकर, प्रदीप पारकर, प्रदीप मांजरेकर, विनायक धुरी आणि संदीप नाईकधुरे देखील उपस्थित होते.