जिल्हा वीज संघटनेच्या उपोषणाला दोडामार्ग वीज ग्राहक संघटनेचा पाठिंबा !

वीज ग्राहक संघटना बैठकीत निर्णय
Edited by: संदीप देसाई
Published on: January 25, 2024 13:48 PM
views 87  views

दोडामार्ग  :  जिल्हा वीज संघटनेच्या २६ जानेवारी रोजी होणाऱ्या लाक्षणिक उपोषणात सहभागी होण्याचा निर्णय दोडामार्ग तालुका वीज ग्राहक संघटनेने घेतला आहे. 

   सोनचाफा हाॅटेल दोडामार्ग येथे तालुका वीज ग्राहक संघटना बैठक संपन्न झाली.  यावेळी पार पडलेल्या बैठकीत जिल्हा वीज संघटनेच्या २६ जानेवारी रोजी होणाऱ्या लाक्षणिक उपोषणात सहभागी होण्याचे सर्वानुमते ठरले. सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या सर्वानुमते कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. नव्याने स्थापन केलेल्या दोडामार्ग तालुका वीज ग्राहक संघटनेच्या बैठकीत अध्यक्ष सुभाष लक्ष्मण दळवी,  सचिव  दशरथ विठ्ठल मोरजकर, सहसचिव भूषण सुधाकर सावंत, उपाध्यक्ष संजय कृष्णा गवस, तालुका समन्वयक सागर शिरसाट, रूपेश मयेकर, पांडुरंग बोर्डेकर, श्रवणकुमार पुरोहित, नवराज कांबळे, रविंद्र खडपकर, मदन राणे, सल्लागार लक्ष्मण कुसो आयनोडकर व  विजय लाडू जाधव, विष्णू मुंज उपस्थित होते.