मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा

वेताळ बांबर्डे सकल मराठा समाजाच एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 01, 2023 17:53 PM
views 232  views

कुडाळ : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून उद्या गुरुवारी दिनांक 2 नोव्हेंबर रोजी मुंबई गोवा महामार्गावर समस्त वेताळ बांबर्डे सकल मराठा समाज एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण छेडणार आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी उपोषण सुरू केले आहे, या आंदोलनाला पाठिंबा म्हणून उद्या एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण समस्त वेताळ बांबर्डे मराठा समाजाच्या वतीने तेलीवाडी बस स्टॉप येथे एकत्र येत हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनाला गावातील मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाज वेताळ बांबर्डे यांच्या वतीने करण्यात आले आहे.