
दोडामार्ग : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग, सावंतवाडी, वेगुर्ला तालुक्यातील दिव्यांग व निराधार गरजूंना छत्रीचे वाटप तसेच गरजू दिव्यांगाची मोफत डोळे तपासणी करून चष्म्याचे वाटप करण्यात आले.
तसेच सावंतवाडी माजगाव येथील मूकबधिर दिव्यांग मुलगी राजलक्ष्मी दत्ताराम मेस्त्री हिची तीन महिन्याची संगणक प्रशिक्षणाची फी दिली. अशा प्रकारे अजित दादा पवार यांचा वाढदिवस राष्ट्रवादी कॉग्रेस दिव्यांग सेल सिंधुदुर्ग च्या वतीने साजरा करण्यात आला. दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादी कॉग्रेस दिव्यांग सेल जिल्हा अध्यक्ष साबाजी सांवत, दोडामार्ग दिव्यांग सेल अध्यक्ष प्रमोद गवस, महिला दिव्यांग सेल अध्यक्ष विजया देसाई, सावंतवाडी दिव्यांग सेल अध्यक्ष स्वानंद कोचरेकर, महिला अध्यक्ष भारती बाणावलेकर, वेंगुर्ला दिव्यांग सेल अध्यक्ष अंकुश केरकर, महिला अध्यक्ष अर्चना आरेकर तसेच प्रत्येक तालुक्यातील दिव्यांग, निराधार व गरजू महिला व राष्ट्रवादी कॉग्रेस चे तालुका पदाधिकारी उपस्थित होते