उबाठा सेनेच्या सुनील सातजींचा शिंदे शिवसेनेत प्रवेश

Edited by:
Published on: December 17, 2023 11:00 AM
views 210  views

वेंगुर्ला : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे रेडी येथील उपविभाग प्रमुख सुनील सातजी यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मुंबई येथील रामटेक निवासस्थानी हा प्रवेश करण्यात आला. यावेळी वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, तालुका संघटक बाळा दळवी आदी उपस्थित होते.