सुनील नारकर यांच्या वाढदिवसाचा जल्लोष | अश्विनी बिले ठरल्या पैठणीच्या मानकरी

भुईबावडा इथं सुरू आहे सांस्कृतिक - क्रीडा महोत्सव
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 10, 2023 18:26 PM
views 302  views

वैभववाडी : उद्योजक सुनील नारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित खेळ पैठणीच्या स्पर्धेत अश्विनी श्रीराम बिले विजेत्या ठरल्या तर उपविजेत्या साक्षी सचिन दळवी ठरल्या आहेत. भुईबावडा येथे हा खेळ रंगला होता.

सुनील नारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या खेळ पैठणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तालुक्यातील महीला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. या स्पर्धेत  एकूण चार विजेत्यांना मानाची पैठणी देण्यात येणार आहे.

प्रथम क्रमांकाला पैठणी, सोन्याचा हार, सोन्याची नथ आणि रोख ११०००/-, उपविजेत्या महिलेला पैठणी, सोन्याची नथ आणि रोख ५०००/- देण्यात आले. तृतीय क्रमांक रुपाली सुरेश पाटील मानाची पैठणी, सोन्याची नथ रोख रक्कम 3000/- तर चौथा क्रमांक दीप्ती दिलीप मोरे हिने पटकावला असून मानाची पैठणी, सोन्याची नथ,आणि रोख 2000 देऊन गौरविण्यात येणार आहे. 11 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता वाढदिवसादिवशी या स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे.