
सावंतवाडी : सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडीचा २९ वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा रविवारी सायंकाळी पार पडत आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केलं जातं.
सेंट्रल इंग्लिश स्कूल ग्राउंड, बहेरचावडा, सावंतवाडी येथे प्रमुख पाहुणे प्रभारी उपशिक्षणाधिकारी अफसर बेगम अब्दुल गनी अवटी यांच्या उपस्थितीत व संस्था कार्याध्यक्ष इम्तियाज खानापुरी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून श्रीराम वाचन मंदिरचे कार्याध्यक्ष ॲड. संदिप निंबाळकर सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापिका निर्मला हेशागोळ व शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पीटीए सदस्य, पालक - शिक्षक कार्यकारीणी समिती सदस्य आणि सेंट्रल इंग्लिश स्कूल, सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी केलं आहे.