बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये उन्हाळी शिबिर उत्साहात...!

Edited by:
Published on: April 21, 2024 07:17 AM
views 200  views

कणकवली : अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था संचलित बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल, कणकवली या शाळेत उन्हाळी शिबिर उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाले. दिनांक 18 एप्रिल 2024 ते 20 एप्रिल 2024 पर्यंत शाळेने उन्हाळी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरामध्ये स्टोन पेंटिंग, पेपर बॅग तयार करणे, क्ले पासून विविध पक्षी - प्राणी बनवणे, एम.सी.एफच्या मार्गदर्शनाखाली झिप लाईन, वॉल क्लाइंबिंग, रिव्हर क्रॉसिंग, रोप, मल्लखांब, आर्चरी, रायफल शूटिंग, तलवारबाजी अशा विविध उपक्रमांचा समावेश होता.  तीन दिवस चालू असलेल्या या उन्हाळी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्वक सर्व उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमांचे सादरीकरण दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी शालेय मैदानावर करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख अतिथी संस्थेच्या संचालिका सौ. सुलेखा राणे, संस्था सदस्य श्री. संदीप सावंत, सौ. प्रणाली सावंत, श्री. अभिजीत सावंत उपस्थित होते. तसेच श्री. एन. बी.राणे, श्री. धीरज डोंगरे, कमांडो शिक्षक श्री. विशाल कोकरे सर देखील उपस्थित होते. 

उन्हाळी शिबिर आयोजित केल्यामुळे विद्यार्थ्यांची भीती कमी होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. मोबाईल मुळे आजकाल विद्यार्थ्यांचा मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्याना शारीरिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी अशा उन्हाळी शिबिरांचे आयोजन आवश्यक आहे. असे मत सौ. सुलेखा राणे यांनी व्यक्त केले. श्री. एन. बी.राणे यांनी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी हसत खेळत संवाद साधला व असेच नवनवीन उपक्रम मध्ये सहभाग घ्या अशा सदिच्छा दिल्या. 

विद्यार्थ्यांनी देखील शिबिरा मधील आपला अनुभव व्यक्त केला. पालक वर्गातून या शिबिराला खूप सुंदर प्रतिसाद दिला व शारीरिक दृष्ट्या तसेच मानसिक दृष्ट्या विकास होण्यासाठी अशी शिबिरे आवश्यक आहेत असे सांगितले. हे उपक्रम घेण्यासाठी एम.सी.एफचे इन्स्ट्रक्टर श्री. प्रणव भोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना खूप छान मार्गदर्शन केले. 

हे शिबिर यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कुलकर्णी व सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. शिबिरांतर्गत दिनांक 20 एप्रिल रोजी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अश्विनी जाधव यांनी केले. नवनवीन उपक्रम राबवणे व त्यातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण विकसित करणे या दृष्टीने शाळा सतत कार्यरत आहे. 

2024 25 साठी नर्सरी पासून इयत्ता दहावी पर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्यासंदर्भात जास्तीत जास्त पालकांनी शाळेला अवश्य भेट द्यावी व संपर्क साधावा. संपर्कासाठी क्रमांक 7841831896 व 9168340403