आजगांव येथील सुलोचना पांढरे यांचे निधन

Edited by: विनायक गांवस
Published on: January 01, 2026 19:32 PM
views 17  views

सावंतवाडी : आजगांव येथील रहिवासी सुलोचना सदगुरु पांढरे ( वय ८२ ) यांचे गुरुवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, पुतणे, पुतण्या, सूना, नातवंडे, जाऊ, चुलत दिर  असा परिवार आहे. आजगांवचे माजी सरपंच कै. सदगुरू उर्फ भाई पांढरे यांची ती पत्नी, किशोर, चंद्रहास व उदय यांची आई  तर पत्रकार सचिन रेडकर यांच्या त्या मामी होत.