
कुडाळ : कुडाळ तालुका खरेदी विक्री सहकारी संघामार्फत शासकीय आधारभूत किंमत भात खरेदी योजना २०२५–२६ सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ संघाचे अध्यक्ष दीपक नारकर यांच्या हस्ते करण्यात आला.
भात खरेदी ऑनलाईन नोंदणी सुरू; नोंदणीची अंतिम तारीख ३० डिसेंबर असून आधारभूत दर रू.२,३६९ प्रति क्विंटल आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व आपला भात संघाच्या अधिकृत खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा, असे आवाहन अध्यक्ष दीपक नारकर यांनी केले आहे. भात खरेदी शुभारंभप्रसंगी उपाध्यक्ष अरविंद शिरसाट, संचालक मंडळ, व्यवस्थापक नंदकिशोर करावडे, धान्य खरेदी प्रमुख सतीश आंबडोसकर तसेच शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते.










