
वैभववाडी : येथील जेष्ठ व्यापारी सुलोचना नामदेव भोवड यांना राष्ट्रीय आदर्श उद्योगरत्न गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.गोवा येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. इंटीग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगाव व नॅशनल रुलर डेव्हलपमेंट फाऊंडेशन यांच्यामार्फत हा पुरस्कार देण्यात आला.
समाजातील विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचा बेळगाव येथील या संस्था पुरस्कार देऊन सन्मान करतात.यावर्षी राष्ट्रीय उद्योग रत्न पुरस्कारासाठी वैभववाडीच्या सुलोचना भोवड यांची या संस्थेने निवड केली.श्रीमती भोवड यांच वैभववाडी शहरात जनरल स्टोअर्स आहे.पानाचे व्यापारी म्हणून ते परिचित आहेत.गेली अनेक वर्षे ते शहरात प्रामाणिकपणे व्यवसाय करीत आहेत.त्यांना यावर्षी जिल्हा व्यापारी संघाचा आदर्श महीला उद्योजिका पुरस्कार प्राप्त झाला होता.त्यांच्या या कार्याची दखल बेळगाव येथील या संस्थानी घेऊन त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले.श्रीमती भोवड यांनी गोवा येथे सहकुटुंब हा पुरस्कार स्वीकारला.