
वेंगुर्ले : जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी काल शेवटच्या दिवशी २१ रोजी उमेदवारी अर्ज मोठ्याप्रमाणात दाखल झाले. महायुती झाल्याने अनेकांनी पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यात भाजपच्या महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ यांना तुळस जिल्हा परिषद मतदार संघातून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यावेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, भाजप पक्षाकडून मी प्रबळ दावेदार असताना हा मतदार संघ महायुतीत शिवसेनेला सोडून उमेदवारी देण्यात आली. यामुळे आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून मी उमेदवरीवर ठाम आहे. गेली अनेक वर्षे मी प्रामाणिकपणे भाजप पक्षाचे काम करत आहे. तुळस गावसहित पंचक्रोशीत सामाजिक कार्यात मी स्वतः कार्यरत आहे. यामुळे या मतदार संघातील जनता ठामपणे माझ्या पाठोशी राहिल याचा मला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.










