
सावंतवाडी : माडखोल येथील आत्महत्या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचा निषेध माडखोल ग्रामस्थांकडून करण्यात आला. चिठीत नाव लिहिलेल्या अल्पवयीन मुलगी व कुटुंबासह गैरवर्तनाचा आरोप ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यासमोर आत्मक्लेश आंदोलन करत केले. यावेळी पोलिस निरीक्षकांनी आंदोलकांना सामोरं जात त्यांच्या भावना समजून घेत कार्यवाहीच आश्वासन दिले. तर, राष्ट्रवादीच्या अर्चना घारेंनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या कानावर हा प्रकार घातला. महाराष्ट्रात दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार वाढत असताना हे प्रकरण जबाबदारीने हाताळाव असं मत व्यक्त केलं.
माडखोल येथील आत्महत्या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचा निषेध माडखोल ग्रामस्थांकडून करण्यात आला. पोलिस ठाण्यासमोर आत्मक्लेश आंदोलन करत संबंधित अधिकारी बदलण्याची मागणी केली. यावेळी ग्रामस्थांची मागणी वरिष्ठांकडे पोहोचवण्याच काम करून त्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करू. तपासात सहकार्य करावं तेवढीच अपेक्षा आहे. बाकी कुठलाही त्रास पोलीसांकडून होणारही नाही. विनाकारण त्रास कधी दिलेला नाही. तपास पूर्ण झाल्याशिवाय कारवाई कुणावरही होणार नाही. कुठल्याही स्त्रीच नाव पोलिसांकडून प्रसिद्ध केलेलं नाही अस पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले.
तर अर्चना घारे-परब म्हणाल्या, अल्पवयीन मुलीच नाव लिहून एकान आत्महत्या केली. त्या विषयीच तपासकार्य चुकीच्या पद्धतीने सुरू होत. पोलिस अधिकाऱ्यांच गैरवर्तन त्यात आढळून आलं. त्यासाठी जाब विचारण्यासाठी आज पोलिस ठाण्यात धडक दिली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या कानावर ही बाब घातली असता त्यांनी पोलिस निरीक्षकांशी फोनवरून संवाद साधला व सुचना केल्या. दरम्यान, चुकीच्या पद्धतीने तपास करणाऱ्या तपासी अधिकाऱ्यांना बदलण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. त्यानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन पोलिस निरीक्षकांनी दिले आहे. चुकीच्या पद्धतीने तपास होणार नाही, मुलीच नाव लिहून आत्महत्या केली तरी नाहक त्रास कुणाला होणार नाही असं त्यांनी सांगितलं. जबाबदारीन ही केस हाताळू असं आश्वासन पोलिस निरीक्षकांनी दिले. त्यामुळे हे आंदोलन तुर्तास थांबवल आहे अस सौ. घारे यांनी सांगितले. यावेळी यावेळी राष्ट्रवादी श.प.च्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, बावळाट सरपंच सोनाली परब, माडखोल ग्रामस्थ राजकुमार राऊळ, संजय लाड, संतोष राऊळ, संतोष राणे, विशाल राऊळ, संदीप सुकी, मनोज घाटकर, संकेत राऊळ, उल्हास राणे, सत्यवान बंड, प्रमोद बंड, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा अँड. सायली दुभाषी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, हिदायतुल्ला खान यांसह माडखोल मेटवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.