
सावंतवाडी : माडखोल येथे सातारा येथील कामगाराने गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केली. देविदास विठ्ठल रांजणे (वय ४२, रा. पाटण जि. सातारा) असे त्याचे नाव असून तो सुशील मोरे यांच्या बागेत काम करत होता. शुक्रवारी त्याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत गोठ्यात आढळून आला. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण करू शकले नाही. काही दिवसांपूर्वी तो या ठिकाणी बागेत काम करण्यासाठी आला होता. अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.