मोती तलावात उडी घेऊन एकाची आत्महत्या

पोलिसांकडून शोधमोहीम सुरु
Edited by: विनायक गावस
Published on: October 09, 2025 23:10 PM
views 387  views

सावंतवाडी : शहरातील मोती तलावात एका व्यक्तीने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रात्री घडली. ही व्यक्ती सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

राजवाड्याच्या समोरील तलावाजवळ ही घटना घडली असून, घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची गर्दी झाली. दरम्यान, सावंतवाडी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून तलावातील शोधमोहीम सुरू आहे.