
देवगड : देवगड तालुक्यातील शिरगांव साटमवाडी येथील पुंडलिक बाळकृष्ण शेटये (84) यांनी आपल्या आजाराला कंटाळून शुक्रवारी सकाळी 6.45 वा.च्या सुमारास राहत्या घरात इलेक्ट्रिक वायरने गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांन कडून हाती लागलेल्या माहितीच्या आधारे पुंडलिक शेटये हे गेली चार वर्षे कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर औषधोपचार सुरु होते.मात्र तब्येतीत सुधारणा होत नसल्याने या आजाराला कंटाळून त्यांनी शुक्रवारी सकाळी 6.45 वा. च्या सुमारास राहत्या घरात इलेक्ट्रिक वायरने गळफास घेत आत्महत्या केली.
या घटनेची फिर्याद त्यांचा मुलगा गणेश पुंडलिक शेटये यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र महाडिक करीत आहेत.ही घटना शुक्रवारी सकाळी 6.45 वा.च्या सुमारास उघडकीस आली.घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे.