
सावंतवाडी : शहरातील उभाबाजार येथील सुहासिनी राधाकृष्ण माळवदे (वय ६५) यांचे शुक्रवारी (ता.७) सकाळी निधन झाले. त्या सध्या मुलाकडे नालासोपारा मुंबई येथे राहात. गेले काही दिवस त्यांची प्रकृती ठिक नव्हती. त्यातच त्यांना हद्यविकाराचा झटका आला.
त्यांच्या मागे दोन मुलगे, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे. मुंबईतील शाळेत सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत विनायक माळवदे यांच्या त्या मातोश्री होत.