उभाबाजारातील सुहासिनी भिसे यांचं निधन

Edited by: विनायक गांवस
Published on: September 09, 2024 06:04 AM
views 215  views

सावंतवाडी : शहरातील उभाबाजार येथील रहिवासी व कै. मुरलीधर भिसे यांचा पत्नी श्रीमती सुहासिनी मुरलीधर भिसे (वय 83) यांचे आज रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. सुप्रसिद्ध छायाचित्रकार व राष्ट्रीय काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष अरुण भिसे यांच्या त्या मातोश्री होत. तर छायाचित्रकार अनिल भिसे, नगरपरिषदेचे भाऊ भिसे यांच्या काकी, जतिन भिसे यांच्या त्या आजी होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, विवाहित चार मुली, जावई,  सुना, नातवंडे, पुतणे, दीर,  भावजया असा मोठा परिवार आहे. सावंतवाडी येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.