वैभववाडीच्या सुधीर नकाशे यांची जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: January 06, 2024 19:44 PM
views 177  views

वैभववाडी : भाजपा तालुका सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे यांची जिल्हा नियोजन समितीच्या निमंत्रित सदस्य पदी निवड झाली. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे.

  श्री.नकाशे हे गेली अनेक वर्षे भारतीय जनता पार्टी पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करीत आहेत. युवामोर्चाच्या माध्यमातून त्यातून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर पाच वर्षे जिल्हा परिषद सदस्य म्हणून  काम केले. आता त्यांची जिल्हा नियोजन समितीच्या निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीनंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.