दोडामार्ग तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी सुधीर दळवी...!

Edited by: संदीप देसाई
Published on: June 29, 2023 11:46 AM
views 103  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांची निवड करण्यात आली आहे. दोडामार्ग तालुक्यातील  सामाजिक क्षेत्रात कार्य केलेली व्यक्ती म्हणून दळवी यांची पालकमंत्री यांच्या शिफारीनुसार ही निवड झाली असून सर्वसामान्य जनतेसाठी गेली अनेक वर्षे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचा खऱ्या अर्थाने सन्मान झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत असून दळवी यांचं अभिनंदन होत आहे.  

राज्यात सेना भाजप सरकार आल्यानंतर पालकमंत्री यांचे शिफारशी नुसार तालुका स्तरावरील सर्व संजय गांधी निराधार योजना समिती पूनर्गठीत करण्यात आल्या आहेत. दोडामार्ग तालुका समिती पुढीप्रमाणे - मागासवर्गीय (अ.जा/अ.ज.) अशासकीय प्रतिनिधी (एक) म्हणुन दिपक बुधाजी जाधव, महीला अशासकिय प्रतिनिधी (एक) मधून पिकुळे गावच्या माजी सरोंच श्रीमती. दीक्षा लक्ष्मण महालकर, इतर मागासवर्गीय वि.जा.भ.ज. प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी (दोन) मधून अंकुश पांडुरंग वेटे, सर्वसाधारण प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी (एक) म्हणूनअभिमन्यू यशवंत कुबल तर संबंधित तालुक्यातील ज्येष्ठ नागरीक, अशासकीय प्रतिनिधी (एक) प्रदीप सिताराम नाईक यांसह शासकीय प्रतिनिधी मधून गटविकास अधिकारी पंचायत समिती दोडामार्ग, मुख्याधिकारी नगरपालिका दोडामार्ग, तहसिलदार / नायब तहसिलदार दोडामार्ग यांच्या निवडीचे आदेश जिल्हाधकाऱ्यांमार्फत दोडामार्ग तहसीलदार यांना प्राप्त झाले आहेत.

या निवडीबद्दल सर्व स्तरातून सुधीर दळवी व इतर सदस्यांचे अभिनंदन होत आहे. तर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शिफारसीने व जिल्हाध्यक्ष राजन तेली साहेब यांच्या पाठपुराव्याने माझ्यासारख्या  एका सामान्य कार्यकर्त्याला तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी काम करण्याची  संधी मिळाली असून या संधीच मी सोनं करेन, तालुक्यातील प्रत्येक पात्र लाभार्थी या योजनेचा लाभार्थी होईल यासाठी सर्व समिती सदस्यांना सोबत घेऊन आपण प्रामाणिक काम करणार असल्याचा विश्वास सुधीर दळवी यांनी व्यक्त केला आहे.