LIVE UPDATES

'गुरुवंदना'...सुधीर आडीवरेकरांची संकल्पना

Edited by: विनायक गांवस
Published on: July 10, 2025 20:10 PM
views 11  views

सावंतवाडी : शहर भाजपच्यावतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सावंतवाडी शहरात विविध क्षेत्रामध्ये चांगले काम करणाऱ्या गुरुजनांचा आशीर्वाद घेत 'गुरुवंदना' कार्यक्रम पार पडला. शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांच्या  संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात आला.

भारतीय जनता पार्टीने संपूर्ण राज्यभरात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवंदना हा कार्यक्रम घेतला. सावंतवाडी शहरातही शहर मंडल अध्यक्ष श्री. आडीवरेकर यांनी कार्यकर्त्यांसमवेत हा कार्यक्रम घेतला. यामध्ये विविध क्षेत्रात चांगले काम करणारे उदाहरणार्थ शिक्षक, डॉक्टर धार्मिक क्षेत्रात काम करणारे व्यक्ती, योगा शिक्षक आदी विविध व्यक्तींची भेट घेत त्यांना गुरुस्थानी मानत त्यांचा आशीर्वाद घेतला.

यावेळी माजी नगरसेवक दिपाली भालेकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, माजी नगरसेवक ॲड. परिमल नाईक, विराग मडकईकर,दिलीप भालेकर, ॲड. संजू शिरोडकर, मिसबा शेख, मेघना साळगावकर, अमित गौंडळकर आदी उपस्थित होते.