
सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी शहर मंडळ अध्यक्षपदी माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांची निवड करण्यात आली आहे. बांदा व आंबोली मंडळ अध्यक्षांची निवड दोन दिवसांत जाहीर करणार असल्याची माहिती जिल्हा चिटणीस महेश सारंग यांनी दिली. युवराज लखमराजे भोंसले यांच्या हस्ते श्री. आडीवरेकर यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांची भाजपच्या शहर मंडळ अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पक्ष कार्यालयासमोर मोठा जल्लोष करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित कार्य करणार असून भाजप नंबर एकचा पक्ष बनवण्याचा विश्वास सुधीर आडीवरेकर यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी युवराज लखमराजे भोंसले, भाजप जिल्हा चिटणीस महेश सारंग, माजी नगरसेवक राजू बेग, आनंद नेवगी, गुरु मठकर, अँड. अनिल निरवडेकर, माजी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, पुखराज पुरोहित, अँड. सिद्धार्थ भांबुरे, चंद्रकांत जाधव, राघवेंद्र चितारी सुमित राऊळ, सुदेश नेवगी, नागेश जगताप, आनंद म्हापसेकर, अमित गौंडळकर, आनंद म्हापसेकर, मिसबा शेख, मेघना साळगावकर, सुकन्या टोपले, महेश बांदेकर, राज वरेरकर, साई परब, अक्षय तानावडे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.