
दोडामार्ग : भारतीय जनता पार्टीची सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारणीत दोडामार्ग भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुधीर आबा दळवी यांची जिल्हा चिटणीस पदी नेमणूक करण्यात आली आहे. सुधीर आबा दळवी यांनी भाजपचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष असताना पक्षाचे प्रामाणिकपणे काम केल्याने त्यांना ही पक्ष श्रेष्ठींकडून जिल्हा स्तरावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. दळवी हे तालुकाध्यक्ष असताना त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत चांगले काम केल्याने तालुक्यातून भरघोस मतदान झाले होते. यावेळी दळवी म्हणाले की, आपण यापूर्वी भाजप पक्ष वाढविण्यासाठी गावागावात काम केले आहे येणाऱ्या काळात याही पेक्षा अधिक काम करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहे असेही ते म्हणाले. तसेच त्यांना ही संधी दिल्याने त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांचे आभार मानले आहेत.