चाफेड भोगलेवाडीतील युवकाचं आकस्मिक निधन

Edited by:
Published on: December 17, 2023 16:51 PM
views 72  views

देवगड : देवगड तालुक्यातील चाफेड भोगलेवाडी येथील छत्रपती उर्फ राजेंद्र भगवान भोगले (वय - ३०)  यांचे शुक्रवारी दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता हृदयविकाराने  निधन झाले. 

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, ४ विवाहित बहिणी, भावोजी, चुलती, चुलत भाऊ, चुलत बहिणी असा परिवार आहे. माजी सरपंच सत्यवान भोगले यांचे ते सख्खे चुलत भाऊ होत.