
वैभववाडी : तळवडे (ता.राजापुर) येथील आदर्श विजय हातणकर या एक वर्षीय बालकाचा तिरवडे तर्फे खारेपाटण येथे मृत्यू झाला. मामाच्या गावी आलेला असताना काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. मात्र त्या बालकाच्या मृत्युचे नेमके कारण समजु शकलेले नाही. या घटनेने दोन्ही गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
राजापुर तालुक्यातील तळवडे येथील आदर्शला घेवुन त्याची आई माहेरी तिरवडे तर्फे खारेपाटणला आली होती. एक वर्षीय आदर्श जन्मापासुन तब्येतीने नाजुक होता. आज सकाळी त्यालाअस्वस्थ वाटु लागल्यामुळे नातेवाईकांनी त्याला उपचाराकरीता उंबर्डे प्राथमीक आरोग्य केंद्रात नेले. परंतु डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषीत केले. त्या बालकाच्या मृ्त्युची खबर त्याचे वडील विजय काशिराम हातणकर यांनी वैभववाडी पोलिस ठाणेत दिली.
त्याचा मृत्यु नेमका कशामुळे झाला हे मात्र समजु शकलेले नाही.मृत बालकाचे पार्थीव शवविच्छेदनासाठी उप जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले.शवविच्छेदन अहवालानंतरच त्याच्या मृत्युचे निश्चित कारण स्पष्ट होणार आहे.परंतु नातेवाईकांकडुन जन्मापासुनच या बालकाची प्रकृती नाजुक स्थितीत होती असे सांगीतले जात आहे.