
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील मुस्लिमवाडी येथे बरकत अली दाऊद खान (वय ३८) यांनी सोमवारी, ४ ऑगस्ट रोजी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांनी घरातील स्वयंपाकघरात लोखंडी बारला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
या घटनेची माहिती बिलाल रहीमतुल्ला शेख यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कुडाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार जाधव हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे पिंगुळी परिसरात शोककळा पसरली आहे.