
सावंतवाडी : सावंतवाडी येथील सुचेता श्रीपाद कशाळीकर (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. कै. डॉ. श्रीपाद कशाळीकर यांच्या त्या पत्नी होत्या. आज राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शहरातील प्रसिद्ध वैद्य कै.डॉ.श्रीपाद कशाळीकर यांच्या त्या पत्नी होत्या. आज माठेवाडा येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. येथील उपरलकर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. सुबोधन कशाळीकर, मेडिकल व्यावसायिक मकरंद कशाळीकर व अनिरुद्ध कशाळीकर यांच्या त्या मातोश्री होत्या.