असा आहे मंत्री केसरकर यांचा जिल्हा दौरा

Edited by:
Published on: July 26, 2024 13:22 PM
views 69  views

सिंधुदुर्गनगरी : शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे दि. २७ जुलै २०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. 27 जुलै 2024 रोजी  सकाळी 9 वाजता सावंतवाडी मतदारसंघातील पूरस्थिती व वीजपुरवठा बाबत आढावा बैठक. स्थळ : नगरपरिषद कार्यालय सावंतवाडी. सकाळी 10 वाजता सिंधुरत्न समृध्दी योजना व चांदा ते बांदा योजनेबाबत आढावा बैठक.  नगरपरिषद कार्यालय सावंतवाडी. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2 वाजता सावंतवाडी येथून मोटारीने फोंडा, गोवाकडे प्रयाण.