असा आहे मंत्री दीपक केसरकर यांचा जिल्हा दौरा

Edited by: विनायक गावस
Published on: July 09, 2023 18:42 PM
views 130  views

सिंधुदुर्गनगरी :शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे दि. 9 व 10 जुलै 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 

रविवार दि.9 जुलै 2023 रोजी रात्रौ. 08.50 वा. मोपा विमानतळ, गोवा येथून मोटारीने लतीफ बेग गार्डन हॉल, सावंतवाडी कडे प्रयाण. रात्रौ. 9.15 वा. वन भोजन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ- लतीफ बेग गार्डन हॉल, मियॉंसाब समाधी समोर, ता. सावंतवाडी) सोईनुसार लतीफ बेग गार्डन हॉल, सावंतवाडी येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, सावंतवाडीकडे प्रयाण. सोईनुसार शासकीय विश्रामगृह, सावंवाडी येथे आगमन व राखीव. 

सोमवार दि. 10 जुलै 2023 रोजी सकाळी 9.00 वा. शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी येथून मोटारीने  आंबोली-गेळे कडे प्रयाण. सकाळी 10.00 वा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सिंधुदुर्ग, प्रांत अधिकारी, तहसिलदार, शिक्षणाधिकारी (माध्य/प्राथ) जि.प. सिंधुदुर्ग यांच्या समवेत प्रस्तावित नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेच्या जागेची पाहणी. (स्थळ- आंबोली-गेळे, ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग). सकाळी 11.00 वा. आंबोली –गेळे शिवसेना व आंबोली-गेळे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभास उपस्थिती. (स्थळ- माऊली मंदिर, आंबोली ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग). दुपारी 12.00 वा. आंबोली माऊली मंदिर, प्रस्तावित हॉल येथील सभामंडप भूमीपुजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.15 वा. माऊली मंदिर, आंबोली येथून मोटारीने सावंतवाडी कडे प्रयाण. दुपारी 1.00 ते 2.30 वा. सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील शिवसेना पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी/कार्यकर्ते तसेच सर्व सामाजिक संस्था( रोटरी क्लब/लायन्स क्लब इ.)समवेत चर्चा. (स्थळ-श्रीधर अपार्टमेंट, एस.टी. स्टँड समोर, सावंतवाडी). दुपारी 2.30 ते 3.30 वा. शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी येथे राखीव. दुपारी 3.30 वा. सावंतवाडी येथून मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस सिंधुदुर्ग कडे प्रयाण.  सायं. 4.00 वा. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती बैठक (स्थळ-समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्ग). सायं. 5.00 वा. डोंगरी विकास कार्यक्रमाअंतर्गत बैठक (स्थळ-समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्ग). सायं. 5.15 वा. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना/ प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत कामांचा आढावा बैठक (स्थळ-समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्ग). साय. 5.30 वा. जिल्हा क्रीडा संकुल समिती बैठक (स्थळ-समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्ग). साय. 5.45 वा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिम जमाती कातकरी यांचे करीता योजना राबविणेबाबत बैठक (स्थळ-समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्ग). सोईनुसार जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस जि. सिंधुदुर्ग येथून मोटारीने गोव्याकडेप्रयाण.