
देवगड : देवगड तहसीलदार कार्यालय येथे दररोज शेकडो नागरिक विविध दाखले, कागदपत्रे, रेशन कार्ड, तसेच अन्य कामे घेऊन येत असतात. त्यामध्ये जेष्ठ नागरिक तसेंच महिला शालेय विद्यार्थी, अपंग नागरिक हे कामानिमित्त येत असतात. परंतु तहसीलदार कार्यालयात नागरिकांना बसण्याची कोणतीही सुविधा नसल्याने त्यांना तासन-तास ताटकळत उभे राहावे लागते. वयोवृद्ध नागरिकांना अक्षरशः त्रास सहन करावा लागतो.
बसण्यासाठी ठेवलेली काही बाकडी मोडकळीस आलेली आहेत.. याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष पाहावयास मिळत आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून शासनाने नवीन इमारत बांधली परंतु कार्यालयामध्ये बसण्याची सुविधा नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. देवगड तहसीलदार यांनी याकडे लक्ष दयावे अशी मागणी होत आहे.