
वैभववाडी : प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या नाधवडे येथील विठ्ठल रखुमाई मंदीरात याही वर्षी आषाढी एकादशी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.याची जय्यत तयारी सुरू झाली आहे.उत्सवानिमित्त येणाऱ्या वारकऱ्यांची सर्व सोय करण्यासाठी गावकरी व मुंबईस्थ मंडळाकडून जय्यत तयारी सुरू आहे.
नाधवडे येथील विठ्ठल रखुमाई मंदीरात दरवर्षी प्रमाणे यंदाही एकादशी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.दरवर्षी हजारोंच्या संख्येने वारकरी या उत्सवाला उपस्थित असतात.तालुक्यासह जिल्ह्यातील दिंड्याही या एकादशीला येथे येतात.या सा-यांची सर्व व्यवस्था नाधवडे आषाढी एकादशी उत्सव समिती यांच्यावतीने करण्यात येते.याहीवर्षी त्यांचं पद्धतीने उत्सव साजरा होणार आहे. त्याची तयारी सुरू झाली आहे.मंदीर परीसराला मंडप व विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.तसेच उत्सवाला येणाऱ्या सर्व वारकऱ्यांच्या फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे.हा उत्सव यशस्वी होण्यासाठी श्रीरंग पावसकर,
प्रल्हाद कुडतरकर,बाळकृष्ण पावसकर,बंड्या मांजरेकर,बाळू कांबळे,प्रकाश पाष्टे ,रोहित पावसकर ,बाबा कोकाटे,सुधीर नकाशे,सुहास सावंत,रमाकांत पांचाळ,संदेश (आबा )सुतार,विशाल ( पप्या )पावसकर,किशोर कुडतरकर,परशुराम इस्वलकर प्रवीण कुडतरकर,रमाकांत रांबाडे,संतोष पेडणेकर,महेश गोखले,प्रफुल कोकाटे,विजय ( बाबू ) तावडे यासह मुंबईकर मंडळी मेहनत घेत आहेत.