राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागणीला यश | पूलाचे दुरुस्तीचे काम सुरु

Edited by: विनायक गावस
Published on: September 04, 2023 22:09 PM
views 103  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागणीला यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून माठेवाडा येथील  मदारीरोड उपरकर शूटिंग रेंज कडे जाणारा पूल कोसळला होता. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून नगरपालिकेला निवेदन देण्यात आले होते. यावेळी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी स्वतः या भागाची पाहणी केली होती. यामुळे नागरिकांची होणारे गैरसोय लक्षात घेऊन नगरपालिकडून या पूलाचे दुरुस्तीचे काम आजपासून सुरू करण्यात आले. त्यामुळे या भागातील रहिवाशांनी मुख्याधिकारी व बांधकाम विभागाबाबत समाधान व्यक्त केले आहे. यावेळी काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर    महिला शहराध्यक्ष सौ राबिया आगा तौसीब आगा  प्रशांत पाटणकर कांचन उपरकर नाना उपरकर संजय नाईक श्रीमती पटेल आदी नागरिक उपस्थित होते