
वैभववाडी : नेर्ले येथे झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये तिथवलीच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.या गुणवंत विद्यार्थ्यांचा ठाकरे शिवसेनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. नेर्ले तिरवडे येथील छत्रपती शिवाजी विद्यालय येथे नुकतेच तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.यामध्ये 'श्री स्वामी विवेकानंद हायस्कूल, तिथवली'च्या दुर्गेश हरयाण आणि मानसी हरयाण या विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेत माध्यमिक गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यांच्या या यशाबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा तिथवलीच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी शाखाप्रमुख नाना जैतापकर, तालुका सचिव गुलजार काझी, शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद मेस्त्री, ओमकार इस्वलकर यांच्यासह शाळेतील इतर शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










