देवगडातील शेठ म.ग.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 07, 2025 18:15 PM
views 231  views

देवगड : देवगड हायस्कूल च्या विद्यार्थ्याने ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशन द्वारे आयोजित डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2024 -25 या स्पर्धेत'”टेरेरियम चा वापर करून शाश्वत लँडस्केपिंग” या नावाचा प्रकल्प सादर करून त्यात सुयश मिळवले आहे. त्याच्या या यशाबद्दल प्रज्योतचे त्याचबरोबर त्याच्या पालकांचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक महादेव घोलराखे, पर्यवेक्षिका सौ निशा दहिबावकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी हार्दिक अभिनंदनकेले आहे.

देवगड येथील शेठ म.ग.हायस्कूल मध्ये इयत्ता सहावी मध्ये शिकत असलेल्या प्रज्योत दिलीप कदम या विद्यार्थ्याने ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशन द्वारे आयोजित डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2024 -25 या स्पर्धेत'”टेरेरियम चा वापर करून शाश्वत लँडस्केपिंग” या नावाचा त्याने प्रकल्प सादर केलेला होता.त्याच्या या प्रकल्पासाठी त्याला मुंबई येथे कांस्य पदक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

त्याच्या या प्रकल्पासाठी शाळेतील विज्ञान शिक्षिका सो अमृता किरकिरे आणि सौ पूजा गोसावी यांनी त्याला मार्गदर्शन केले होते.