
सावंतवाडी : बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्टने २५ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. सदर स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या एकूण ५२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात अस्मी सावंत, मनवा साळगावकर, भूमी नानोस्कर, सरस नाईक, भुवन दळवी, वेद बेळगावकर, प्रत्यूशा घोगळे या ७ विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सहभागी करून घेण्यात आले.
वरील विद्यार्थ्यांना 'विशेष सहभाग प्रमाणपत्र' देण्यात ले आहे. तसेच सरस सतीश नाईक या इयत्त्ता ३ री च्या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक पटकावला. त्याच्या यशाबद्दल त्याला विशेष प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले. वरील सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेच्या शिक्षिका सुषमा पालव व कु. विनायकी जबडे या कलाशिक्षिकांनी मार्गदर्शन केले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका दिशा कामत व प्रशालेचे संस्थापक अॅड. ऋजुल पाटणकर यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना कलाशिक्षणाच्या पुढील वाटचालसाठी प्रोत्साहन दिले.