अ‍ॅबेकस स्पर्धेत सावंतवाडीच्या शुभ्रा म्हाडेसरचं यश

Edited by:
Published on: January 24, 2025 16:43 PM
views 157  views

सावंतवाडी : अ‍ॅबेकस स्पर्धेत सावंतवाडीच्या शुभ्रा शैलेश म्हाडेसर हिने यश मिळविले आहे. पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या १४ व्या नॅशनल आणि ७ व्या इंटरनॅशल स्पर्धेत ती सहभागी झाली होती. ठाणे-कळवा येथील रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये ती इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यााकांसह अन्य शिक्षकांनी तिचे कौतुक केले.