विज्ञान मेळाव्यात भगवती हायस्कूलच्या दीक्षा मुणगेकरचं यश

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 03, 2023 15:44 PM
views 129  views

देवगड : देवगड तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात मुणगे येथील श्री भगवती हायस्कूलने तृतीय क्रमांक मिळवला आहे. तालुकास्तरीय विज्ञान मेळावा माध्यमिक विद्यालय जामसंडे येथे नुकताच संपन्न झाला. यामध्ये तालुक्यातील 14 शाळांनी सहभाग घेतला होता.

त्यामधून मुणगे श्री भगवती हायस्कूलच्यावतीने भरड धान्य पौष्टिक आहार की आहार भ्रम या विषयावर दहावीची विद्यार्थिनी दीक्षा रवींद्र मुणगेकर हिने सादरीकरण केले. यामध्ये तिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. तिला विज्ञान शिक्षक प्रसाद बागवे यांचे मार्गदर्शन लाभले दीक्षा हिच्या या याशाबद्दल अभिनंदन होत आहे.